mahans.co.in

  • अक्षर आकार वाढवा
  • डिफॉल्ट अक्षर आकार
  • अक्षर आकार कमी करा

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र - जानेवारी 2114

ई-मेल प्रिंट पीडीएफ़
LAST_UPDATED2
 

काळी पत्रिका

एखाद्या विषयाची शासकीय दीर्घकालीन वाटचाल व सद्यस्थिती सांगण्यासाठी शासन श्वेतपत्रिका काढते. जादूटोणा कायद्याबाबत आघाडी शासन व युती शासन या दोघांच्या सलग १८ वर्षाच्या कालहरणाची व कचखाऊ धोरणाची वस्तूस्थिती लोकांसमोर ठेवण्यासाठी महाराष्ट्र अंनिसने ही काळी पत्रिका प्रकाशित केली आहे. 

पुढे वाचा...
 

महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, २०११

ई-मेल प्रिंट पीडीएफ़

महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत

व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, २०११L.A.BILL No.XLI OF 2011.सन २०११ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४१अज्ञान आणि अंधविश्वासावर पोसल्या जाणाऱ्या अनिष्ट व दुष्ट रूढी आणि प्रथांपासून समाजातील सर्वसामान्य लोकांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने, आणि समाजातील सर्वसामान्य लोकांचे शारीरिक व आर्थिक नुकसान करून त्यांचे शोषण करण्याच्या व त्याद्वारे समाजाची घडीच विस्कटून टाकण्याच्या दुष्ट हेतूने भोंदू-वैद्य व भोंदूबाबा यांनी सर्वसामान्यत: जादूटोणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तथाकथित अमानवी किंवा अलौकिक शक्तीच्या किंवा अद्भूत शक्तीच्या किंवा भूतपिशाच्य यांच्या नावाने रुजवलेल्या अंध-विश्वासातून निर्माण झालेल्या नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट, दुष्ट व अघोरी प्रथांचा मुकाबला करून त्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने, समाजामध्ये जनजागृती व जाणीव निर्माण करण्याकरिता तसेच निकोप व सुरक्षित वातावरण निर्माण करण्याकरिता; आणि त्याच्याशी संबंधित किंवा तदानुषंगिक बाबींसाठी तरतूद करण्याकरिता विधेयक.-------------------------          ज्याअर्थी, नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट, दुष्ट व अघोरी प्रथा, आणि भोंदू-वैद्य व भोंदूबाबा यांच्याकडून केले जाणारे जादूटोण्याचे व भूतपिशाच्याचे प्रयोग यामुळे समाजातील सर्वसामान्य लोकांचे शारीरिक व आर्थिक नुकसान आणि शोषण होण्याच्या घटना सातत्याने उघडकीस येत असून त्यांचे प्रमाण अत्यंत भयावह आहे;          आणि ज्याअर्थी, अशा नुकसानकारक प्रथा, चालीरिती व रूढी आणि जादूटोण्यावरील अंध-विश्वास आणि अशा इतर अमानुष, अनिष्ट, दुष्ट व अघोरी प्रथा व त्यांचे अनिष्ट परिणाम आणि त्यांचा प्रसार यांना परिणामकारक रीतीने प्रतिबंध घालण्यासाठी व त्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि जादूटोणा करणाऱ्या व्यक्ती, भोंदू-वैद्य व भोंदूबाबा यांचा आपल्याकडे अद्भूत किंवा चमत्कारी उपाय किंवा शक्ती असल्याचा खोटा दावा आणि त्यांची समाजविघातक व नुकसानकारक कृत्ये यांमुळे समाजाची घडीच विस्कटण्याचा आणि अधिकृत व शास्त्रीय वैद्यकीय उपाय व उपचार यावरील सर्वसामान्य लोकांच्या विश्वासाला तडा जाण्याचा धोका निर्माण झाला आहे, आणि अंध-विश्वास व अज्ञानामुळे तो अशा भोंदू-वैद्य, भोंदूबाबा व जादूटोणा करणाऱ्या व्यक्तींचा आश्रय घेत आहेत, अशा परिस्थितीत, अशा जादूटोणा करणाऱ्या व्यक्ती, भोंदू-वैद्य व भोंदूबाबा यांच्या कुटिल कारस्थानांना बळी पडण्यापासून सर्वसामान्य लोकांना वाचविण्यासाठी उचित व कठोर सामाजिक व कायदेविषयक उपाययोजना करणे शासनाला अत्यावश्यक झाले आहे; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या बासष्टाव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे:-संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ. कलम १. (१) या अधिनियमास, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, २०११ असे म्हणावे. (२) तो, संपूर्ण महाराष्ट्र राज्यास लागू असेल.(३) तो, राज्य शासन, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियत करील अशा दिनांकास अंमलात येईल.व्याख्याकलम २. (१) या अधिनियमात, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर, -(क) संहिता याचा अर्थ, फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ असा आहे : (१९७४ चा २)(ख) नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा’’ याचा अर्थ, एखाद्या व्यक्तीने, या अधिनियमाला जोडलेल्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या किंवा वर्णन केलेल्या कृतीपैकी कोणतीही कृती स्वत: करणे किंवा इतर कोणत्याही व्यक्तीकडून करवून घेणे किंवा त्या कृती करण्यास इतर कोणत्याही व्यक्तीला प्रवृत्त करणे, असा आहे; (ग) विहित याचा अर्थ, या अधिनियमाखाली केलेल्या नियमांद्वारे विहित, असा आहे;(घ) प्रचार करणे याचा अर्थ, नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांच्याशी संबंधित किंवा त्याविषयी जाहिरात, साहित्य, लेख किंवा पुस्तक यांचे वितरण करणे किंवा ते प्रसिद्ध करणे, असा आहे आणि त्यामध्ये, नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांच्या संबंधातील कोणतेही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपातील सहाय्य, अपप्रेरणा, सहभाग किंवा सहकार्य देणे यांचा समावेश होतो;(ड) नियम याचा अर्थ, या अधिनियमान्वये केलेले नियम, असा आहे.(२) यात वापरलेल्या परंतु व्याख्या न केलेल्या शब्दांना व शब्दप्रयोगांना, औषधिद्रव्ये व जादूटोण्याचे उपचार (आक्षेपार्ह जाहिराती) अधिनियम, १९५४ (१९५४ चा २१) व संहितेमध्ये जे जे अर्थ नेमून देण्यात आले आहेत. ते ते अर्थ असतील. नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व त्यांचे समूळ उच्चाटन.कलम ३. (१) कोणतीही व्यक्ती एकतर स्वत: किंवा इतर कोणत्याही व्यक्तीमार्फत या अधिनियमास जोडलेल्या अनुसूचीमध्ये नमूद किंवा वर्णन केलेल्या, नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा करणार नाही किंवा त्यांचे प्रचालन किंवा प्रचार किंवा आचरण करणार नाही किंवा प्रचालन, प्रचार किंवा आचरण करावयास लावणार नाही.(२) हा अधिनियम अंमलात आल्याच्या दिनांकापासून कोणत्याही व्यक्तीने स्वत: किंवा इतर कोणत्याही व्यक्तीमार्फत नरबळी आणि इतर अमानुष व अघोरी प्रथा व जादूटोणा अशा स्वरूपाची कोणतीही कृती केली असेल आणि या अधिनियमांच्या तरतुदींचे उल्लंघन करून, नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी  प्रथा व जादूटोणा यांची जाहिरात, आचरण प्रचार किंवा प्रचालन केले तर, तो या अधिनियमाच्या तरतुदींखाली अपराध ठरेल आणि अशा अपराधासाठी दोषी असलेली व्यक्ती दोष सिद्ध झाल्यानंतर सहा महिन्यांहून कमी नसेल परंतू, सात वर्षाहून असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची आणि पाच हजार रुपयांपेक्षा कमी नसेल, परंतु, पन्नास हजार रुपयांपर्यंत असू शकेल एवढ्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र असेल. (३) जी कोणतीही व्यक्ती पोट-कलम(२) अन्वये शिक्षापात्र असलेल्या कोणत्याही कृतीस किंवा अपराधास अपप्रेरणा देईल किंवा कोणतीही कृती किंवा अपराध करण्याचा प्रयत्न करील, तिने तो अपराध केला असल्याचे मानण्यात येईल आणि दोष सिद्ध झाल्यानंतर, तिला पोट-कलम (२) मध्ये अशा अपराधासाठी जो शिक्षा असेल तीच शिक्षा करण्यात येईल.(४) पोट-कलम(२) खालील शिक्षापात्र अपराध हे दखलपात्र व अजामीनपात्र असतील.कलम ४.  अपराधाची न्याय-चौकशी करण्याची अधिकारिता. कलम ३ अन्वये शिक्षापात्र असलेल्या कोणत्याही अपराधाची न्याय-चौकशी, महानगर दंडाधिकारी किंवा प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्या न्यायालयापेक्षा कनिष्ठ दर्जाच्या न्यायालयात चालविण्यात येणार नाही.कलम ५. कंपन्यांनी केलेले अपराध.(१)   या अधिनियमाखालील अपराध एखाद्या कंपनीने केला असेल त्याबाबतीत, तो अपराध घडला त्यावेळी जिच्याकडे कंपनीचा प्रभार होता व जी कंपनीचे कामकाम चालविण्यास जबाबदार होती अशी प्रत्येक व्यक्ती, तसेच कंपनी त्या अपराधासाठी दोषी असल्याचे मानण्यात येईल आणि तद्नुसार तिच्याविरूद्ध कारवाई केली जाण्यास आणि शिक्षा दिली जाण्यास ती पात्र असेल;परंतु, अशा कोणत्याही व्यक्तीने तो अपराध तिच्या नकळत घडला होता किंवा असा अपराध घडू नये म्हणून तिने प्रयत्नांची शिकस्त केली होती असे सिद्ध केले तर, या पोट-कलमामधील कोणत्याही गोष्टीमुळे कोणतीही अशी व्यक्ती या अधिनियमाखालील कोणत्याही शिक्षेस पात्र ठरणार नाही. (२)   पोट-कलम(१) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, या अधिनियमाखालील एखादा अपराध कंपनीने केला असेल आणि तो अपराध, त्यासंबंधात कंपनीची योग्य ती काळजी किंवा पर्यवेक्षण करण्यासाठी जबाबदार असलेल्या कंपनीचा कोणताही संचालक, व्यवस्थापक, सचिव किंवा अन्य अधिकारी यांच्या संमतीने किंवा मुकानुमतीने किंवा त्यांनी कोणतेही दुर्लक्ष केल्याने घडला असल्याचे सिद्ध झाले तर, असा संचालक, व्यवस्थापक, सचिव किंवा संबंधित अधिकारी, हा त्या अपराधाबद्दल दोषी असल्याचे मानण्यात येईल आणि त्यानुसार त्याच्याविरूद्ध कारवाई केली जाण्यास आणि शिक्षा दिली जाण्यास पात्र असेल. स्पष्टीकरण - या कलमाच्या प्रयोजनार्थ-(क) ‘‘कंपनी’’ याचा अर्थ, निगम निकाय, असा आहे आणि त्या भागीदारी संस्था, व्यक्तींचा संघ किंवा व्यक्तींची संस्था- मग ती विधिसंस्थापित असो किंवा नसो आणि तसेच, त्यात विश्वस्तव्यवस्था, मग ती त्या त्या वेळच्या कोणत्याही कायद्यान्वये नोंदणीकृत असो किंवा नसो, यांचा समावेश होतो; आणि (ख) ‘‘संचालक’’ याचा भागीदारी संस्थेच्या संबंधातील अर्थ, भागीदारी संस्थेमधील एक भागीदार, आणि व्यक्तींचा संघ किंवा व्यक्तींची संस्था, या संबंधातील अर्थ, तिच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणारा कोणताही सदस्य, असा आहे व विश्वस्तव्यवस्थेच्या संबंधात त्या विश्वस्तव्यवस्थेचे व्यवस्थापन करणाऱ्या व्यक्तीचा त्यात समावेश होतो. कलम ६. दक्षता अधिकारी.(१)   राज्य शासनास, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, आणि त्या अधिसूचनेत विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा अटी व शर्तींना अधीन राहून, त्या अधिसूचनेत विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा राज्याच्या कोणत्याही एक वा अनेक पोलीस ठाण्यांत, दक्षा अधिकारी म्हणून ओळखले जाणारे किंवा अनेक पोलीस अधिकारी नियुक्त करता येतील: परंतु, असा पोलीस अधिकारी हा पोलीस निरीक्षक, गट याच्या दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसेल.(२)   दक्षता अधिकाऱ्याची कर्तव्ये पुढीलप्रमाणे असतील-(एक) त्याच्या अधिकारितेच्या क्षेत्रामध्ये या अधिनियमाच्या आणि त्याखाली केलेल्या नियमांच्या तरतुदींचे उल्लंघन किंवा भंग याचा तपास करणे व त्यास प्रतिबंध करणे, आणि त्याच्या अधिकारतेच्या क्षेत्रामधील जवळच्या पोलीस ठाण्याकडे अशा प्रकरणांची तक्रार दाखल करणे; आणि (अशा कृत्यास) बळी पडलेल्या कुणाही व्यक्तीने अथवा तिच्या वतीने अन्य कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही पोलीस ठाण्याकडे तक्रार दाखल केली असता, त्यावर योग्यरित्या व वेगाने कार्यवाही होईल याची खातरजमा करणे व आवश्यक तो सल्ला, मार्गदर्शन आणि मदत संबंधित पोलीस ठाण्याला करणे;(दोन) या अधिनियमाच्या तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींचा खटला परिणामकारकपणे चालविण्यासाठी पुरावा गोळा करणे; आणि ज्या क्षेत्रामध्ये असे उल्लंघन झाले आहे किंवा केले जात आहे त्या क्षेत्रातील पोलीस ठाण्यात त्याबाबतची तक्रार दाखल करणे;(तीन) यासंबंधात राज्य शासनाकडून, वेळोवेळी, सर्वसाधारण किंवा विशष आदेशाद्वारे त्याला नेमून देण्यात येतील अशी इतर कर्तव्ये पार पाडणे. (३) पोट-कलम(१) अन्वये नियुक्त करण्यात आलेला दक्षता अधिकारी आपली पदीय कर्तव्ये किंवा कामे पार पाडत असताना त्यात अडथळे आणणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस, दोष सिद्धी झाल्यानंतर, तीन महिन्यांपर्यंत असू शकेल एवढ्या मुदतीच्या करावासाची किंवा, पाच हजार रूपयांपर्यंत असू शकेल एवढ्या द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.(४) दक्षता अधिकारी, भारतीय दंड संहितेच्या कलम २१ च्या अर्थांतर्गत लोकसेवक असल्याचे मानण्यात येईल. (१९६० ५ चा ४५.)कलम ७. प्रवेश करणे, झडती घेणे, इत्यादीचे अधिकार(१)   राज्य शासनाने, याबाबत वेळोवेळी दिलेल्या सर्वसाधारण किंवा विशेष आदेशांना अधीन राहून, दक्षता अधिकाऱ्याला, त्याच्या अधिकारतेतील क्षेत्राच्या स्थानिक मर्यादेत, त्याच्या क्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्याच्या सहाय्याने-(एक) या अधिनियमाखालील अपराध केला आहे किंवा करण्यात येत आहे असे त्यास सकारण वाटत असेल तर, अशा कोणत्याही ठिकाणी, सर्व वाजवी वेळी, त्यास आवश्यक वाटेल अशा सहाय्यांसह, कोणतेही असल्यास, प्रवेश करता येईल व झडती घेता येईल; (दोन) या अधिनियमाच्या तरतुदींचे उल्लंघन करून कोणतीही कृती किंवा गोष्ट करण्यासाठी जे वापरण्यात आले होते किंवा वापरण्यात येत आहे असे त्यास सकारण वाटत असेल तर, असे कोणतेही साहित्य, उपकरण किंवा जाहिरात जप्त करता येईल;(तीन) खंड(एक) मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही जागेत आढळलेल्या कोणत्याही अभिलेखाची, कागदपत्राची किंवा इतर महत्त्वाच्या वस्तूची तपासणी करता येईल आणि जर ती या अधिनियमाखाली शिक्षापात्र असलेला अपराध केल्याचा पुरावा म्हणून सादर करता येईल असे त्यास सकारण वाटत असेल तर, ती जप्त करता येईल.(२) संहितेच्या तरतुदी, संहितेच्या कलम ९४ अन्वये काढलेल्या अधिपत्राच्या प्राधिकाराखाली केलेल्या कोणत्याही झडतीस व जप्तीस जशा लागू होतात, तशाच त्या, त्या अधिनियमान्वये केलेल्या कोणत्याही झडतीस किंवा जप्तीस, शक्य होईल तेथवर, लागू होतील.(३) जर एखाद्या व्यक्तीने, पोट-कलम(१) च्या खंड (दोन) किंवा (तीन) अन्वये काहीही जप्त केले असल्यास, ती व्यक्ती, शक्य तितक्या लवकर, त्याबाबत दंडाधिकाऱ्यास कळवील व त्याच्या अभिरक्षेसाठी दंडाधिकाऱ्याचे आदेश घेईल. कलम ८. सन १९५१ चा मुंबई पोलीस अधिनियम क्रमांक २२ याची कलमे १५९ आणि १६० यांच्या तरतुदी लागू असणे.मुंबई पोलीस अधिनियम १९५१ ची कलमे १५९ व १६० च्या तरतुदी, दक्षता अधिकाऱ्याने या अधिनियमांतर्गत सद्भावनापूर्वक केलेल्या कृतींना, असा अधिकारी हा जणू काही उक्त अधिनियमांतर्गत पोलीस अधिकारी असल्याचे समजून लागू असतील.कलम ९. संहितेच्या तरतुदी लागू असणे. या अधिनियमाखालील अपराधांच्या अन्वेषणाला व न्यायचौकशीला संहितेच्या तरतुदी लागू असतील.कलम १०. हा अधिनियम अन्य कोणत्याही कायद्यास पूरक असणे व न्यूनीकरण करणारा नसणे.या अधिनियमाच्या तरतुदी, त्या त्या वेळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्यास पूरक असतील व त्याचे न्यूनीकरण करणाऱ्या नसतील.कलम ११. दोष सिद्धीची वस्तुस्थिती प्रसिद्ध करणे.(१) कोणतीही व्यक्ती, या अधिनियमान्वये शिक्षापात्र असलेल्या कोणत्याही अपराधाबद्दल सिद्धपराध ठरली असेल त्याबाबतीत, अशा अपराध्याला सिद्धपराध ठरविणारे न्यायालय, असा अपराध जेथे घडला असेल तेथील स्थानिक वृत्तपत्रांमध्ये अशा व्यक्तीचे नाव व निवासाचे ठिकाण आणि अशा अपराध्यास या अधिनियमाखालील अपराधाबद्दल सिद्धापराध ठरविण्यात आले आहे, ही वस्तुस्थिती तसेच, जो तपशील प्रसिद्ध करण्याची परवानगी देणे न्यायालयास योग्य व उचित वाटेल असा अन्य तपशील, पोलिसांकडून प्रसिद्ध करण्याची व्यवस्था करण्यास सक्षम असेल. (२) अशा आदेशाविरूद्ध दाखल केलेले अपील (कोणतेही असल्यास) अंतिमत: निकाली काढण्यात येईपर्यंत, पोट-कलम (१) अन्वये अशी कोणतीही प्रसिद्धी करण्यात येणार नाही. कलम १२. नियम (१) राज्य शासनास, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, आणि पूर्व प्रसिद्धीच्या शर्तीस अधीन राहून, या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्यासाठी, नियम करता येतील.(२) या अधिनियमाखाली करण्यात आलेला प्रत्येक नियम, तो करण्यात आल्यानंतर शक्य तितक्या लवकर, राज्य विधानमंडळाचे अधिवेशन चालू असताना, एकाच अधिवेशनात किंवा लागोपाठच्या दोन किंवा त्याहून अदिक अधिवेशनात, मिळून एकूण तीस दिवसांचा होईल इतक्या कालावधीकरिता, राज्य विधानमंडळाच्या प्रत्येक सभागृहापुढे ठेवण्यात येईल, आणि ज्या आधिवेशनात तो अशा रितीने ठेवण्यात आला असेल, ते अधिवेशन किंवा ज्याच्या लगतनंतरचे अधिवेशन किंवा अधिवेशने समाप्त होण्यापूर्वी, त्या नियमात कोणताही फेरबदल करण्यास दोन्ही सभागृहे सहमत होतील किंवा तो नियम करण्यात येऊ नये म्हणून दोन्ही सभागृहे सहमत होतील आणि असा त्यांचा निर्णय, राजपत्रात अधिसूचित करतील तर, असा निर्णय राजपत्रात प्रसिद्ध करण्यात असल्याच्या दिनांकापासून, तो नियम अशा फेरबदल केलेल्या स्वरूपातच अंमलात येईल किंवा यथास्थिती, अंमलात येणार नाही; तथापि, असा कोणताही फेरबदल किंवा विलोपन यामुळे त्या निमयान्वये पूर्वी करण्यात आलेल्या किंवा करण्याचे वर्जिलेल्या कोणत्याही गोष्टीच्या विधिग्राह्यतेस बाधा येणार नाही.कलम १३. व्यावृत्तीशंका दूर करण्यासाठी याद्वारे असे घोषित करण्यात येते की, ज्यामुळे कोणत्याही व्यक्तीला शारीरिक वा आर्थिक बाधा पोहचत नाही असे कोणतेही धार्मिक विधी व धार्मिक कृत्ये अंतर्भूत असलेल्या कृतींना या अधिनियमातील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही.  अनुसूची(कलम २ (१) (ख) पहा.)१. भूत उतरविण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तीला, दोराने किंवा साखळीने बांधून ठेऊन तिला मारहाण करणे, काठीने किंवा चाबकाने मारणे, तिला पादत्राणे भिजवलेले पाणी प्यायला लावणे, मिरचीची धुरी देणे, त्या व्यक्तीला छताला टांगणे, त्याला दोराने किंवा केसांनी बांधणे, किंवा त्या व्यक्तीचे केस उपटणे, व्यक्तीच्या शरीरावर किंवा अवयवांवर तापलेल्या वस्तूचे चटके देऊन इजा पोहोचविणे, व्यक्तीला उघड्यावर लैंगिक कृत्य करण्याची जबरदस्ती करणे, व्यक्तीवर अमानुष कृत्य करणे, व्यक्तीच्या तोंडात जबरदस्तीने मूत्र किंवा विष्टा घालणे किंवा यासारख्या कोणत्याही कृती करणे.२. एखाद्या व्यक्तीने तथाकथित चमत्कारांचा प्रयोग प्रदर्शित करून, त्याद्वारे आर्थिक प्राप्ती करणे; आणि अशा तथाकथित चमत्कारांचा प्रचार व प्रसार करून लोकांना फसवणे, ठकवणे आणि त्यांच्यावर दहशत बसविणे.३. अलौकिक शक्तीची कृपा मिळविण्याच्या हेतूने, ज्यामुळे जिवाला धोका निर्माण होतो किंवा शरीराला जिवघेण्या जखमा होतात अशा अमानुष, अनिष्ट व अघोरी किंवा प्रथांचा अवलंब करणे; आणि अशा प्रथांचा अवलंब करण्यास इतरांना प्रवृत्त करणे, उत्तेजन देणे किंवा सक्ती करणे.४. मौल्यवान वस्तू, गुप्त धन आणि जलस्त्रोत यांचा शोध घेण्याच्या बहाण्याने वा तत्सम कारणाने करणी, भानामती या नावाने कोणतेही अमानुष, अनिष्ट व अघोरी कृत्य आणि जादूटोणा करणे, आणि जारणमारण अथवे देवदेवस्की यांच्या नावाखाली नरबळी देणे, किंवा देण्याचा प्रयत्न करणे, किंवा अशी अमानुष कृत्ये करण्याचा सल्ला देणे, त्याकरिता प्रवृत्त करणे, अथवा प्रोत्साहन देणे.५. आपल्या अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवून अथवा एखाद्या व्यक्तीत दैवी शक्ती संचारली असल्याचा अभास निर्माण करून इतरांच्या मनात भीती निर्माण करणे किंवा त्या व्यक्तीचे सांगणे न ऐकल्यास वाईट परिणाम हेतील अशी इतरांना धमकी देणे. ६. एखादी विशिष्ट व्यक्ती करणी करते, जादूटोणा करते किंवा भूत लावते किंवे मंत्रतंत्राने जनावरांचे दूध आटवते, असे सांगून त्या व्यक्तीबाबत तसा संशय निर्माण करणे, किंवा त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती अपशकुनी आहे किंवा रोगराई पसरण्यास कारणीभूत ठरणारी आहे असे भासवून अशा व्यक्तीचे जगणे मुश्किल करणे, त्रासदायक करणे वा कठीण करणे; एखादी व्यक्ती सैतान असल्याचे किंवा ती सैतानाचा अवतार असल्याचे जाहीर करणे.७. जारणमारण, करणी किंवा चेटूक केल्याच्या नावाखाली एखाद्या व्यक्तीला मारहाण करणे, तिची नग्नावस्थेत धिंड काढणे, किंवा तिच्या रोजच्या व्यवहारांवर बंदी घालणे.८. मंत्राच्या सहाय्याने भूत पिशाच्चांना आवाहन करून, किंवा भूत पिशाच्चांना आवाहन करीन अशी धमकी देऊन सर्वसामान्य जनतेच्या मनात घबराट निर्माण करणे, मंत्रतंत्र अथवा तत्सम गोष्टी करून एखाद्या व्यक्तीस विषबाधेतून मुक्त करतो आहे असे भासवणे. एखाद्या व्यक्तीला तिला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून, त्याऐवजी तिला अमानुष, अनिष्ट व अघोरी कृत्य वा उपाय करण्यास प्रवृत्त करणे, अथवा मंत्रतंत्र(चेटूक), जादूटोणा अथवा अमानुष कृत्ये करून किंवा तसा आभास निर्माण करून एखाद्या व्यक्तीला मृत्यूची भीती घालणे, शारीरिक वेदना करण्याची किंवा तिचे आर्थिक नुकसान करण्याची धमकी देणे.९. कुत्रा, साप किंवा विंचू चावल्यास एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून, त्याऐवजी मंत्रतंत्र, गंडेदोरे किंवा यासारखे उपचार करणे.१०. बोटाने शस्त्रक्रिया करून दाखवतो असा दावा करणे किंवा गर्भवती स्त्रीच्या गर्भाचे लिंग बदल करून दाखवतो असा दावा करणे. ११. (क) स्वत:च विशेष अलौकिक शक्ती असल्याचे अथवा कुणाचातरी अवतार असल्याचे वा स्वत:च पवित्र आत्मा असल्याचे भासवून किंवा त्याच्या नादी लागलेल्या व्यक्तीस पूर्वजन्मी तू माझी पत्नी, पती वा प्रेयसी, प्रियकर होता असे सांगून, अशा व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवणे.(ख) मूल न होणाऱ्या स्त्रीला अलौकिक शक्तीद्वारा मूल होण्याचे आश्वासन देऊन तिच्याशी लैंगिक संबंध ठेवणे. १२. एखाद्या मतिमंद व्यक्तीमध्ये अलौकिक शक्ती असल्याचे भासवून त्या व्यक्तीचा वापर धंदा व व्यवसाय यासाठी करणे. उद्देश व कारणे यांचे निवेदन१. नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा, आणि भोंदू-वैद्य व भोंदूबाबा यांच्याकडून केले जाणारे जादूटोण्याचे व भूतपिशाच्याचे प्रयोग यामुळे समाजातील सर्वसामान्य लोकांचे शारीरिक वा आर्थिक नुकसान व शोषण होण्याच्या घटना उघडकीस येत असून हे प्रमाण अत्यंत भयावह आहे.२. अशा अनिष्ट आणि अमानुष प्रथा, रूढी इत्यादीबाबत एक विशेष व कठोर कायदा अधिनियमित करून त्याद्वारे, या नुकसानकारक व अमानुष प्रथा आणि जादूटोण्यावरील अंध-विश्वास, आणि अशा इतर अमानुष, दुष्ट व अघोरी प्रथा व त्यांचे अनिष्ट परिणाम आणि त्यांचा प्रसार यांना परिणामकारक रितीने प्रतिबंध घालण्यासाठी व त्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी, आणि जादूटोणा करणाऱया व्यक्ती, भोंदू-वैद्य व भोंदूबाबा यांची समाजविघातक व नुकसाकारक कृत्ये यांमुळे समाजाची घडीच विस्कटण्याचा आणि अधिकृत व शासकीय वैद्यकीय उपाय व उपचार यावरील सर्वसामान्य लोकांच्या विश्वासाला तडा जाण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे आणि ते अशा भोंदू-वैद्य, भोंदूबाबा आणि जादूटोणा करणाऱ्या व्यक्तींचा आश्रय घेत आहेत, अशा परिस्थितीत, अशा जादूटोणा करणाऱ्या व्यक्ती, भोंदू-वैद्य व भोंदूबाबा यांच्या कुटील कारस्थानांना बळी पडण्यापासून सर्वसामान्य लोकांना वाचवण्यासाठी उचित व कठोर सामाजिक व कायदेविषयक उपाययोजना करणे शासनाला अत्यावश्यक झाले आहे.३. अधिनियमाची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत -          (एक) ‘‘नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा’’ या शब्दप्रयोगाची व्याख्या देऊन, नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा आणि जादूटोणा यांच्या आचरणावर, प्रचालनावर व प्रसारावर, आणि भोंदू-वैद्य, भोंदूबाबा इत्यादींकडून केली जाणारी अनधिकृत व बेकायदेशीर वैद्यकी, औषधयोजना व उपचार यावर बंदी घालण्यात आली आहे. या अधिनियमांन्वये, अशा कृतीस अपराध ठरविण्यात आले आहे आणि जरब बसण्यासाठी असे अपराध दखलपात्र व अजामीनपात्र ठरविण्यास आले असून अशा अपराधांकरिता कठोर शिक्षेच्या तरतुदी करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे; (दोन) या अधिनियमाच्या व त्याखाली केलेल्या नियमांच्या तरतुदींचे उल्लंघन होत आहे किंवा कसे, याचा तपास करणे आणि त्याला प्रतिबंध करणे, तसेच या कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर परिणामकारक खटला भरण्यासाठी साक्षीपुरावे गोळा करणे, याकरिता एक दक्षता अधिकारी असेल, अशी तरतूद करण्यात आली आहे;(तीन) या अधिनियमाच्या तरतूदींखालील अपराध केल्याबद्दल एखाद्या व्यक्तीच्या दोषसिद्धीसंबंधातील तपशील प्रसिद्ध करण्यासंबंधीचे अधिकार न्यायालयाला प्रदान करू शकेल अशी समर्थकारी तरतूद करण्याचे प्रस्तावित केले आहे; आणि(चार) इतर अनुषंगिक व संबंधित बाबी.४. वरील उद्दिष्टे साध्य करणे हा या विधेयकाचा हेतू आहे. मुंबई,                                                                               शिवाजीराव मोघे८ ऑगस्ट २०११                                                               सामाजिक न्यायमंत्री. वैधानिक अधिकार सोपविण्यासंबंधीचे ज्ञापन.या विधेयकात वैधानिक अधिकार सोपविण्यासंबंधीचे पुढील प्रस्ताव अंतर्भूत आहेत : -खंड १ (३) या खंडान्वये, ज्या दिनांकास हा अधिनियम अंमलात येईल तो दिनांक राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियम करण्याचा अधिकार राज्य शासनाकडे घेण्यात आला आहे.खंड ६ (१) या खंडान्वये, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, अशा अधिसूचनेत विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा एक वा अनेक पोलीस ठाण्यांत, दक्षता अधिकारी म्हणून ओळखले जाणारे, एक किंवा अनेक पोलीस अधिकारी नियुक्त करण्याचा अधिकार राज्य शासनाकडे घेण्यात आला आहे.खंड १२ - या खंडान्वये, या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्याकरिता राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, नियम करण्याचा अधिकार राज्य शासनाकडे घेण्यात आला आहे.२. वैधानिक अधिकार सोपविण्यासंबंधी वरील प्रस्ताव सामान्य स्वरूपाचे आहेत.  महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय(सन २०११ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४१.)अज्ञान आणि अंधविश्वासावर पोसल्या जाणाऱ्या अनिष्ट व दुष्ट रूढी आणि प्रथांपासून समाजातील सर्वसामान्य लोकांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने, आणि समाजातील सर्वसामान्य लोकांचे शारीरिक व आर्थिक नुकसान करून त्यांचे शोषण करण्याच्या व त्याद्वारे समाजाची घडीच विस्कटून टाकण्याच्या दुष्ट हेतूने भोंदू-वैद्य व भोंदूबाबा यांनी सर्वसामान्यत: जादूटोणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तथाकथित अमानवी किंवा अलौकिक शक्तीच्या किंवा अद्भूत शक्तीच्या किंवा भूतपिशाच्य यांच्या नावाने रूजवलेल्या अंध-विश्वासातून निर्माण झालेल्या नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व दुष्ट व अघोरी प्रथांचा मुकाबला करून त्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने, समाजामध्ये जनजागृती व जाणीव निर्माण करण्याकरिता; आणि त्याच्याशी संबंधित किंवा तदानुषंगिक बाबींसाठी तरतूद करण्याकरिता विधेयक. श्री.शिवाजीराव मोघेसामाजिक न्याय मंत्री, महाराष्ट्र राज्य डॉ.अनंत कळसेप्रधान सचिव,महाराष्ट्र विधानसभा. ---------------------शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई(शा.म.मु.) एचबी 1415 - 3 (800-8-2011)
LAST_UPDATED2
 


पान 1 च्या 7

विशेष

सांगली जिल्ह्यातील तासगांवच्या फारूक गवंडी व त्याच्या पंचविस साथीदारांनी मे महिन्याच्या भर उन्हात पाच  दिवस पाच गावामध्य़े सायकल फेरी काढली. जनमानसाला साद घालीत अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत प्रबोधन करणाऱ्या या यात्रेचा वेगळेपणा म्हणजे पंचविस तरूणांचा या कार्यासाठीचा सळसळता उत्साह. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच.